जाणून घेऊ या भगवान शिवशंकरांशी निगडित काही रोचक तथ्ये
जाणून घेऊ या भगवान शिवशंकरांशी निगडित काही रोचक तथ्ये जरा हटके , सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / तथ्य , महादेव , रोचक , शंकर / August 6, 2019 श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असून या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या आराधनेला विशेष महत्व दिले जाते. याच निमित्ताने शिवशंकरांशी निगडित काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या. ♨️ भगवान शिव अनादि मानले गेले आहेत. ♨️‘ अनादि ’ म्हणजे सदैव अस्तित्वात असलेले हे दैवत असल्याने 👉यांचा जन्म कसा झाला, 👉यांचे मातापिता कोण हे कोणीच सांगू शकत नाही. ♨️ भगवान शिवाच्या नर्तन करत असतानाच्या रूपाला ‘नटराज’ म्हटले गेले असून, हे नृत्यकलेचे दैवत आहे. ♨️ कोणत्याही देवतेची मूर्ती भंगलेली असली, तुटली असली, तर या मूर्तीची पूजा केली जात नाही , मात्र शिवलिंग कितीही खंडित असले, तरी त्याची पूजा केली जाण्याची परंपरा आहे. ♨️शिवशंकरांना एक भगिनी असून, तिचे नाव अमावरी असे होते. ♨️पार्वतीच्या आग्रहाखातर शिवशंकरांनी स्वतःच्या मायाशक्तीने अमावरीला अस्तित्वात आणले होते. ♨️ भगवान शिव आणि प...